Monday, June 29, 2020

विद्यार्थी देशाचे भविष्य आहे की राजकीय भांडवल??


विद्यार्थी देशाचे भविष्य आहे की राजकीय भांडवल?? 

सध्या राज्यात कोरोना महामारी ने काय थैमाम मांडुन ठेवलाय हे वेगळे सांगायची गरज नाही. संपूर्ण जीवनमान विस्कळीत झाले आहे. कुणाला जेवायला अन्न मिळत नाहीए तर कुणाला हाताला काम मिळत नाहीए सर्व आपल्या आपल्या अडचणींमुळे मानसिक दडपणाखाली जगत आहे. 



            या सर्वांमध्ये आणखी एक मोठा समुह आहे तो कुठेतरी दुर्लक्षीत होत आहे ना त्याच्यासाठी प्रसारमाध्यमे धाव घेत आहेत ना कुठलाही पुढारी उघडपणे बोलत आहे. थोडक्यात एक दोन विद्यार्थी संघटना वगळता बाकी सर्व बघ्याची भुमिका घेत आहे. एवढच काय तर पालक वर्ग पण फक्त सरकार च्या निर्णयाची वाट बघत आहे. आणि जो मोठा समुह यात भरडला जात आहे त्याच नाव आहे "अंतिम वर्षाचे विद्यार्थी" 
         आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. सावंत सर अनेक दिवसांपासून विद्यार्थाच्या फेसबुक लाईव च्या माध्यमातून संपर्कात आहेत जरुर पण थोडक्यात त्याच्या कडून प्रत्येक वेळच्या भेटी नंतर एकच आश्वासन दिसते ते म्हणजे "विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्या जाईल". थोडक्यात त्याला आधार पण मिळाला तो म्हणजे मा. मुख्यमंत्री यांच्या त्या घोषणे नंतर ज्यात स्पष्टपणे सांगितले होते की अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करण्यात येत आहे व एटिकेटी च्या विद्यार्थासाठी येत्या २ दिवसात योग्य तो निर्णय घेऊन आराखडा विद्यार्थ्यांन समोर मांडण्यात येईल. संपूर्ण विद्यार्थ्यांची एकदाची संम्रभाच्या अवस्थेतून सुटका झाली अस वाटल. पण कदाचित हा आनंद काही तासा पर्यंतचाच होता. 
       त्या नंतर लगेच आशिषजी शेलार हे मा. राज्यपाल यांची भेट घेतात आणि नंतर मा. राज्यपाल साहेबांचे ट्विट येते की हा निर्णय विद्यापीठ कायद्याचा भंग आहे तसेच कुलपति या नात्याने त्यात त्यांचे मत हे सर्वात महत्त्वाचे होते तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यात त्याच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हा निर्णय विद्यार्थांन पुढ ठेवला. व त्यांनी कडक शब्दांत सांगीतले की अंतिम वर्षाच्या परिक्षा कुठल्याही परिस्थितीत होणारच!! आणि दबक्या आवाजात या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात नक्कीच मोठा फरक पडले हा विचार कदाचित सत्ताधारी व विरोधीपक्ष करत आहे हि चर्चा रंगली आहे. आणि कदाचित याच कारणामुळे या निर्णयाला एवढा विलंब होत आहे.
         हि झाली आता पर्यंतची परिस्थिती पण या मध्ये विद्यार्थाच्या मवावर काय परिणाम होतोय याची कल्पना कुणी करत आहे का? विद्यार्थाला किती मानसिक दडपणाखाली राहाव लागत आहे याचा विचार कुणी करत आहे का? शेवटच वर्ष म्हणजे फक्त शेवटच वर्ष नसुन ते प्रत्येक विद्यार्थाच्या नवीन आयुष्याची पहिली पायरी समजल्या जाते. कितीतरी विद्यार्थावर त्यांच्या घरच्यांनच्या जबाबदार्याच ओझ राहते झटपट कुठेतरी काम मिळवुन कुठुंबाला आधार मिळावा हा मानस राहतो तर कुणाला उच्चशिक्षणासाठी कुठेतरी शिक्षणाला जायचे असते. थोडक्यात आपण कधीतरी एकांतात जी छान छान स्वप्न रंगवितो त्यातीललच एक भाग हा. पण सध्या राज्यातील शैक्षणिक परिस्थिती पाहता "कुणाचच पण खेटर कुणाच्याच पायात नाही " हि म्हण सार्थकी ठरेल. 
         दुसरा मुद्दा असा की काही बुद्धीजीवी लोकांच अस म्हणन आहे की परीक्षा न होने हा विद्यार्थ्यांच्या भविष्या सोबत अन्याय होईल.परिक्षा या झाल्याच पाहिजे तर त्यांना सांगु इच्छीतो की कुठलाही विद्यार्थी हा शेवटच्या वर्षापर्यंत पोहोचला म्हणजे नक्कीच त्यांने आतापर्यंत सर्व परिक्षा दिल्याच असतील आणि याचाच अर्थ असा की तो या समोरची परिक्षा देण्यास सुद्धा सक्षम आहे. थोडक्यात विद्यार्थी हा परिक्षेला घाबरत नाही. तो घाबरत आहे फक्त आणि फक्त आपल्या जिवाला कारण त्याच्यावर त्याचे आईवडील त्याचे कुटुंब अवलंबून आहे. 
        शेवटी शासनाला एवढच सुचवायचे आहे की परिक्षा घेणे न घेने हा त्यांचा निर्णय आहे विद्यार्थांना लवकरात लवकर या संभ्रम अवस्थेतून सुटका करावी. परिक्षा घ्यायच्या असल्यास विद्यापीठ कायद्यानुसार परिक्षेच्या ६० दिवसा अगोदर विद्यार्थांना सुचना करण्यात यावी. सर्व विद्यार्थांचा विमा काढण्यात यावा. व परिक्षा केंद्रावर कडक पहारा देत कुठलाही विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात न यावा याची दक्षता घ्यावी. किंवा जर परिक्षा रद्द करण्यात येत असेल तर त्या बद्दल सांगावे. 
             निर्णय कुठलाही असो तो लवकर घेण्यात यावा कारण या विद्यार्थी हे देशाच भविष्य आहे राजकारण करायच भांडवल नाही.

सुरज ग. जामठे
संस्थापक अध्यक्ष
लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन (महाराष्ट्र)


No comments:

Post a Comment

तुम्हाला सुद्धा एका सुंदर मुलीचा विडिओ काँल येऊ शकतो, पण सावधान!!

      एक दिवस आपण नेहमी प्रमाणे आपले Whatsapp उघडतो. आणि अचानक एका नवीन नंबर वरून मेसेज आलेला दिसतो. वाँट्सप नंबर च्या डिपी वर एका सुंदर मुल...