Sunday, June 13, 2021

तुम्हाला सुद्धा एका सुंदर मुलीचा विडिओ काँल येऊ शकतो, पण सावधान!!

      एक दिवस आपण नेहमी प्रमाणे आपले Whatsapp उघडतो. आणि अचानक एका नवीन नंबर वरून मेसेज आलेला दिसतो. वाँट्सप नंबर च्या डिपी वर एका सुंदर मुलीचा फोटो असतो. आणि बोलता बोलता तोल सुटतो आणि जे नको घडायच ते घडून जाते.......!!
        मित्रांनो आज मानवाने किती प्रगती केली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहेतच पण या प्रगती सोबतच कुप्रगती म्हणजे पैसा मिळविण्या साठी व्यक्ति कुठल्या स्तरावर जाईल याचा अंदाज सुद्धा आपण लावु शकत नाही. आज आपण ज्या फसव्या जाळा बद्दल माहिती मिळविणार आहात त्याला "हनीट्रप" असेही म्हटल्या  जाते. म्हणजेच नावाप्रमाणेच या मध्ये लालूच दाखवून फसवणुकीचा प्रकार प्रामुख्याने घडतो. ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रेमाच्या किंवा अन्य तत्सम गोष्टी चे आमिष दाखवून कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा बळजबरी न करता आपल्या मनाप्रमाणे काम करुन घेतात. 
          हनीट्रप च्या माध्यमातून फसवणूक करने हि गोष्ट फार पूर्वी पासुन होत आलेली आहे. इतिहासात अनेक वेळा या हनीट्रप चा वापर करुन मोठमोठ्या कारस्थानांना पार पाडण्यात आले किंवा त्यांचा खात्मा सुद्धा करण्यात आला. ज्यावेळी शत्रू राष्ट्र शक्तिशाली सोबतच बुद्धीमान असायचे थोडक्यात जेथे हेर (जासुस) सुद्धा शरणागती पत्करायचे तेथे या हनीट्रप चा योग्य वापर करुन डाव साधल्या जात असायचा. ज्या मध्ये कुठल्याही दलाच्या मुख्य अधिकार्यांला लक्ष करुन फसविल्या जात असे. ज्यामध्ये बर्याच वेळा एक सुंदर मुलगी अगोदरच ठरविण्यात आलेल्या अधिकार्यांच्या संपर्कात यायची आणि प्रेमात पडायची. त्या नंतर जवळीकता वाढविल्या नंतर अत्यंत गोपनीय योजनेबाबत संपूर्ण माहिती शत्रूराष्ट्रांना होत असे. अशे एक ना अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. 
       हि झाली थोडक्यात आंतराष्ट्रीय स्तरावरील माहीती आता वळूयात सामान्य माणसांकडे. यावेळी तुम्हाला आपसुकच प्रश्न पडला असेल की!! ना आपण कुठले मोठे अधिकारी? ना आपल्या जवळ कु़ठली गोपनिय माहीती? तर आपल्याला कश्याला घाबरायची गरज?. तर मित्रांनो आपल्याला घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची गरज आहे. आणि आपण हनीट्रप मध्ये कसे अडकु शकतो ते खालील उदाहरणावरून कळेलच. 
        एके दिवशी श्याम (नाव बदललेले) ला वाँट्सअप वर एका अनोळखी मुलीचा मेसेज येतो. आणि समोरुन "साँरी चुकुन मेसेज आला" असा पहिला मेसेज दिसतो आणि अश्या पद्धतीचे संभाषण सुरू होते. अगोदर शाम ने दुर्लक्ष केल, कारण त्याला वाटले की आपल्याच मित्रांमधुन कुणीतरी मस्करी करत असेल. पण रात्री ११ च्या सुमारास परत मेसेज येतो की "काय करत आहात?" त्यावेळी मात्र श्याम चा तोल सुटतो आणि तो विश्वास ठेवून बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर याच प्रमाणे एक आठवडा  चँटिग सुरु राहते. आता मात्र श्याम ला कुठेतरी न पाहिलेल्या न भेटलेल्या प्रेमाचा सुगंध त्या संभाषणातुन दरवडायला लागतो. आणि घरची माहीती, फॅमिली बॅकग्राउंड, पैसे, मित्र- मैत्रीण एकंदरीत सर्व माहीती तो मोठमोठ्या डिंगा हाकत तो देत असतो. 
       त्यानंतर असच बोलन सुरु असतांनाच समोरुन मुलगी सरळ विडीओ काँल वर बोलायची ईच्छा दर्शवते. श्याम ला जणुकाही एक कठिण परिक्षा पास झाल्याचा आनंद मिळतो आणि तो पण क्षणात तयार होतो. मात्र विडिओ काँल मधे तुमचा चेहरा दिसायला हवा हि अट ठेवण्यात येते. श्याम छानपैकी तयारी करुन काँल ची आतुरतेने वाट बघत असतो. शेवटी काँल येतो!! ह्रदयाची गती एकदम वाढते, काँल उचलल्या जातो. आणि जसा तो काँल सुरु होतो  त्याच्या समोर एक मुलगी विवस्त्र अवस्थेत त्याच्या समोर उभी असते. 
         त्याला काही कळायच्या आत तो काँल कट होतो. आणि थोड्याच वेळात त्याला एक एडिट केलेला विडिओ त्याच नंबर वरुन मिळतो. ते बघुन त्याच्या पायाखालची जमिन जणू घसरते कारण त्या विडिओ मध्ये तो अत्यंत वाईट स्थितीत दिसतो. त्यात फक्त जेव्हा त्यांने काँल उचलला तेव्हाचा विडिओ आणि त्याच कपड्यांमध्ये दुसऱ्या मुलाचा विडिओ एक सोबत जोडुन जणू त्याचे पोर्न विडिओत रुपांतर केले असा विडिओ दिसतो. 
      आणि पुढचा मेसेज आला ज्यामध्ये त्याला २ लाख रुपयाची मागणी करण्यात आली. किंवा तसे न केल्यास त्याचा तो विडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन त्याच्या आई वडीलांना पण पाठवेल हि धमकी देण्यात येते. आणि क्षणात संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाल्याचा अनुभव श्याम ला येतो. 
        मित्रांनो आज श्याम प्रमाणेच अनेक युवक या फसव्या जाळ्यात अडकून संकटात सापडले आहेत. किंवा अजुनही सापडत आहेतच. आता आपल्या पैकी बर्याच लोकांना प्रश्न पडला असेल कि एवढ्या गंभीर विषयावर अजूनही कुठल्या प्रकारची दखल का घेण्यात आली नाही. तर त्याला उत्तर हेच की त्याला त्या प्रकरणाला तिथेच संपवायचे असते. म्हणून हा प्रश्न कधी चव्हाट्यावर आलाच नाही. 
         आता यापासून स्वतचे रक्षण कसे करायचे? तर शक्यतोवर जेव्हा कुणाचा असा मेसेज आपल्याला आला त्यावेळी तो कुणाचा आहे हे ट्रुकाँलर किंवा आपल्या जवळच्या मित्रांकडुन तपासून घ्या बोलतांना घाई करु नका. जर फेसबुक वरुन अश्या प्रकारचा मेसेज येत असेल तर त्यामध्ये आपले म्युच्युअल फ्रेन्ड्स किती आहेत. सोबतच किती दिवसा अगोदर च्या पोस्ट आहेत. हे तपासुन घ्या. आणि शक्यतोवर अनोळखी लोकांशी बोलतांना सयंम ठेवा. मित्रांनो हे आपल्या सोबत नाही होणार किंवा मला काही फरक पडत नाही. मानसिकते मध्ये न राहात सतर्क राहा कारण "अपघात हा लाखो प्रसंगामधुन एकदाच होतो, पण जेव्हा होतो तेव्हा आयुष्य उध्वस्त करुन जातो", काळजी घ्या.

अँड. सुरज गजाननराव जामठे
संस्थापक अध्यक्ष, 
लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन महाराष्ट्र
मो. ९७६६२५७०६७

No comments:

Post a Comment

तुम्हाला सुद्धा एका सुंदर मुलीचा विडिओ काँल येऊ शकतो, पण सावधान!!

      एक दिवस आपण नेहमी प्रमाणे आपले Whatsapp उघडतो. आणि अचानक एका नवीन नंबर वरून मेसेज आलेला दिसतो. वाँट्सप नंबर च्या डिपी वर एका सुंदर मुल...