Sunday, June 28, 2020

कोरोना, मानुस मारला, पण निसर्ग तारला!!


कोरोना, माणुस मारला, पण निसर्ग तारला!!

जगात प्रत्येक गोष्ट ला दोन बाजू असतात आज कोरोना वायरस सारख्या वैश्विक महामारी मुळे जग नक्कीच संकटात सापडले आहे पण त्यालाच दुसरी बाजु हि की लोकांना त्याच्या खर्या गरजांची जाणिव झाली आहे. लोकांचा वावर कमी झाल्यामुळे निसर्ग स्वच्छंदी पणे श्वास घेतोय. मनाला हेलावून टाकणार्या गंभीर घटना म्हणजेच खून, बलात्कार, चोरी अश्या घटनांचा आकडा शुन्यावर आला आहे. नद्या खळखळून वाहत आहे. आणि विशेष म्हणजे जो माणूस फक्त व्यवहारिक झाला होता तो आता खर्या अर्थाने पारिवारिक झाला आहे.
आज कोरोना या वैश्विक महामारी ने संपुर्ण विश्वाला आपल्या वेठिस धरले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि उद्योग धंदे बंद पडले आहे आणि नक्कीच जग हे जागतिक मंदीच्या दारात उभ आहे. आज लाखो लोक या भयंकर महामारिच्या विळख्यात अडकून जीवन आणि मरणाची लढाई लढत आहे. मुळचा चिन या देशातुन सर्वीकडे पसरलेल्या या कोरोना वायरस मुळे आज जगातील सर्वच देश याच्या दहशतीच्या वातावरणात जगत आहे. आणि विशेष म्हणजे या विषारी वायरस मुळेे उघड्यावर राहणाऱ्या अत्यंत गरीब व्यक्ति पासुन ते जागतिक दर्जाची सुरक्षतेच्या घेर्यात राहणार्या आतंरराष्ट्रीय नेत्यांना सुद्धा या वायरस ची लागण झाली आहे. काही देश वगळता सर्व देशामध्ये तेथील सरकार ने कडक कायदे करुन लाँकडाऊन केला आहे. आणि न भुतो!! न भविष्यती!! आज जगातील ७० टक्के जनता हि आपल्याच घरात कैद झाली आहे. आणि सद्यस्थितीत हिच एक गोष्ट आहे जी आपल्याला या वायरस च्या संसर्गापासून वाचवु शकते. आता हि गंभीर परिस्थिती झाली मनुष्यासाठी पण या सर्वांन मुळे कमालीचा फायदा झालाय तो पर्यावरणाला. आज सर्वच जगात औद्योगिक क्रांति मुळे झपाट्याने वाढलेले उद्योग धंदे त्यामुळे माणसाचे जीवनमान उंचावले. सर्व सुखसोयींनी माणुस हा ओतप्रोत झाला. पण याच नशेत तो पर्यावरणाचा किती भयंकर प्रमाणात ह्रास करत होता या कडे थोड हि लक्ष देत नव्हता. जागतिक पर्यावरण टिकण्यासाठी अनेक समित्या गठण करण्यात आल्या. अनेक कडक कायदे सुद्धा बनविण्यात आले पण फक्त आणि फक्त पैश्याच्या मोहा पाई अंधाधुंध प्रदुषण पसरविण्यात आले. आज फॅक्टरी किंवा वाहनातून निघणार्या धुरा मुळे हवेची गुणवत्ता एवढी खराब झाली आहे कि अत्यंत छोट्या मुलापासून ते वयोवृद्धापर्यत प्रत्येकाला श्वसनाचे आणि फुफ्फुसांचे आजार झपाट्याने वाढत आहे. त्याच बरोबर या विषारी गँसेस मुळे आपल्या पृथ्वी चे सुरक्षा कवच म्हणजेच ओझोन पट्टयाला भयंकर हानी होत आहे आणि म्हणूनच पृथ्वी चे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या मधुन अस्वच्छ आणि केमिकल युक्त प्रदुषित पाण्याला छोट्यामोठ्या नद्यांच्या प्रवाहामार्फत वाहून नेऊन कितीतरी नद्यां या फक्त नावापुरत्या मर्यादित राहिल्या आहे. आज या कोरोना मुळे जो लाँकडाऊन झाला आहे तो पर्यावरणासाठी नक्किच हितकारक झाला आहे. संपूर्ण उद्योग धंदे बंद असल्यामुळे हवेच्या गुणवत्ते वाढ झाली आहे. वाहतूक पुर्ण पणे बंद असल्यामुळे कार्बनडाइऑक्साइड कमी झाल्यामुळे जे लोक दमा आणि श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते त्यांना आराम मिळतोय. करोडो रुपये खर्च करुन सुद्धा जि गंगा नदी साफ होऊ शकली नाही त्याच नदीच्या पाण्याची गुणवत्ता हि ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. यमुनेच्या पाण्यात सुद्धा तेच सकारात्मक बदल दिसून येत आहे. आज रस्तावर ते प्राणी आढळून येत आहे त्यांची आपण फक्त नावे एैकली होती. चिन सारख्या देशात महिन्याकाठी हजारो लोक हे फक्त दुषित वातावरणामुळे मरायचे त्याचा आकडा नाहीसा झाला आहे. एक बाजु जरी खुप विदारक असली तरी दूसरी बाजु नक्किच पर्यावरणासाठी लाभकारी ठरली आहे. आपले डाॅक्टर वैज्ञानिक लवकरच यासाठी उपचार शोधतीलच यात शंका नाही. तो पर्यंत आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण शासनाला सहकार्य करावे व घरातच स्वतःला सुरक्षित ठेवावे. सोबतच आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आपला निसर्ग आपल्याला टिकवुन ठेवायचा आहे कारण या निसर्गामुळेच आपले अस्तित्व आहे. कारण आज फक्त एका वायरस मुळे आपल्याला या परिस्थितीत लोटल आहे जर भविष्यात या निसर्गानेच आपल्या विरोधात धावा बोलला तर पुर्ण पृथ्वी वरील सजीव सृष्टी धोक्यात येईल....... सुरज ग. जामठे संस्थापक अध्यक्ष लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन अमरावती.

No comments:

Post a Comment

तुम्हाला सुद्धा एका सुंदर मुलीचा विडिओ काँल येऊ शकतो, पण सावधान!!

      एक दिवस आपण नेहमी प्रमाणे आपले Whatsapp उघडतो. आणि अचानक एका नवीन नंबर वरून मेसेज आलेला दिसतो. वाँट्सप नंबर च्या डिपी वर एका सुंदर मुल...